ग्रामपंचायत खिर्डीसाठे चा परिचय


अंगणवाडीला पोषण आहार शिजविणे कामी ग्रामपंचायतीने साहित्य दिले आहे.
सरपंच सौ. छाया राजेंद्र नागरे यांचे हस्ते साहित्य अंगणवाडी कार्यकर्ती यांना ताब्यात दिले.
खिर्डीसाठे या गावाला जवळची बाजारपेठ नगरसूल असून तालुक्याची बाजरपेठ येवला व नांदगाव हे आहे. गावालगत एक मध्यम स्वरूपाचा तलाव MI TANK आहे. ज्यातून गावाला व शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवठा होतो. यात नगरसूल गावाला पिण्याचे पाणी व सिंचनासाठी पाणी देण्यात येते. गावाला बारमाही जोडणारे रस्ते असून त्यात नगरसूल - येवला,पिंपळखुटे तिसरे, आहेरवाडी, लाहित, जायदरे, लोहशिंगवे ई. गावांना जोडणारे रस्ते आहे. गावाचे एकूण ------ एवढे क्षेत्र असून ४६६.९५ हे.आर. एवढी जमीन लागवडी योग्य आहे. सरकारी जमीन -क्षेत्र ३.९४ हे.आर. वन विभागाचे क्षेत्र - १२७.२३ हे. आर. आहे. गावातील 46 जेष्ठ नागरिक वृध्द व्यक्तींना वृद्धापकाळ योजनेचा लाभ देण्यात येतो तर ६ विधवा निवृत्ती वेतन योजनेचा लाभ देण्यात येत आहे. दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेत ३ लाभार्थी यांना लाभ देण्यात येतो.
ग्रामपंचायत खिर्डीसाठे हे येवला तालुक्यात असून नाशिक जिल्ह्यातील पूर्व भागात आहे. जिल्हा केंद्रापासून १०५ किमी अंतर असून तालुक्यापासून उत्तर दिशेला १६ किमी अंतरावर आहे. ग्रामपंचायत खिर्डीसाठे येथील सन २०११ ची लोकसंख्या १५०९ इतकी असून एकूण कुटुंब संख्या ३३३ इतकी आहे. यात पुरुष -७९७, स्रिया -७१२ आहे. अनुसूचित जातीची लोकसंख्या - १८३ यात पुरुष -९७,स्रिया -८६ आहे. अनुसूचित जमातीची लोकसंख्या -३९७ असून यात पुरुष -२०९, स्रिया - १८८ एवढी आहे.
ग्रामपंचायत खिर्डीसाठे येथे इयत्ता १ ली ते ५ वी पर्यत प्राथमिक शिक्षणाकरिता शाळा आहे. तसेच पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी २ अंगणवाडी केंद्र आहे. तसेच आरोग्य तपासणी व सेवा करिता गावात आरोग्य वर्धिनी केंद्र आहे. ज्यातून गावातील सर्व नागरिकांना सेवा दिल्या जातात. गावात ज्ञानजोती सावित्रीबाई फुले अभ्यासिका आहे.ज्यात
समीक्षा
हमारे लोगों की आवाज़ यहाँ सुनें
ग्राम विकास में सरकार की पहल से हमारी जिंदगी में सुधार आया है। सेवाएं प्रभावी और समय पर मिलीं।
राम त्यागी
खिरड़ी
सरकार की transparency और responsiveness देखकर मन को बहुत संतोष हुआ। ग्राम समाज में विश्वास बढ़ा है।
सुमित्रा देव
साथे
